मुलांचे उच्च शिक्षण, व्यवसायाचा विस्तार, खेळत्या भांडवलाची गरज, मालमत्ता किंवा वाहनासाठी डाउनपेमेंट, वैद्यकीय आणीबाणी, कौटुंबिक खर्च किंवा शेतीविषयक गरजांसाठी आपण सुवर्ण कर्जाचा लाभ घेऊ शकता.
व्याजदर : १२%
वैशिष्ट्ये आणि फायदे :
- २% सेवा शुल्क
- सुलभ आणि तात्काळ कर्ज मंजुरी
- कोणतेही छुपे शुल्क नाही
- जामीनदारांची आवश्यकता नाही
- जलद मंजुरी आणि त्वरित कर्ज वाटप
- सोन्याच्या दागिन्यांची १००% सुरक्षितता
- कर्ज परतफेड पद्धत: धनादेश / ईएमआय / ईसीएस
- कर्ज मर्यादा : सोन्याच्या मूल्यांकनाच्या ७५%
- कर्ज परतफेड कालावधी: कमाल १६ महिन्यांपर्यंत
पात्रता :
- अर्जदार सोन्याच्या दागिन्यांचा खरा मालक असावा
- कर्ज केवळ पतसंस्थेच्या सभासदालाच दिले जाऊ शकते
- अर्जदाराकडे मासिक हप्ता भरण्यासाठी पुरेसे उत्पन्न उपलब्ध असावे
आवश्यक कागदपत्रे :
- अर्जदाराचा रहिवासी पुरावा
- अर्जदाराचा ओळख पुरावा
- अर्जदाराचा उत्पन्नाचा पुरावा
- दागिन्यांची मूळ खरेदी पावती
- अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचे फोटो
*नियम व अटी लागू (Terms & Conditions apply)