पुष्पक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., मुंबई ची स्थापना ३१ डिसेंबर १९९८ रोजी कांजूरमार्ग, मुंबई येथे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० अंतर्गत करण्यात आली. संस्थेचे कार्यक्षेत्र बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, अहमदनगर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये विस्तारलेले आहे.
गेली २५ वर्षांहून अधिक काळ अविरत विश्वासासह, संस्था १९ शाखा, ९८+ हून अधिक दैनिक ठेव प्रतिनिधी आणि ५०+ समर्पित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून २५,०००+ पेक्षा जास्त सभासद व ग्राहकांना अविरत सेवा देत आहे. ४००+ कोटींपेक्षा अधिक व्यवसाय टर्नओव्हर आणि सातत्याने 'अ' वर्ग ऑडीट दर्जा राखत, संस्था आधुनिक संगणकीकृत प्रणाली, एसएमएस सुविधा, व डोअरस्टेप बँकिंगच्या माध्यमातून सर्वांगीण आर्थिक समृद्धीसाठी कटिबद्ध आहे.
कर्ज ईएमआय, मुदत ठेव आणि आवर्ती ठेवींचा परतावा अचूकपणे मोजा.